बारामती प्रतिनिधी
बारामती : बारामती परिसरा मधील शाळा आणि महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टुकार रोड रोमिओंना निर्भया पथकाचा दणका बारामती वाहतूक पोलीस आणि निर्भया पथकाची धडाकेबाज कारवाई!
बारामती शहरातील विविध शाळा महाविद्यालय तसेच कोचिंग क्लासेस परिसरात विनाकारण मोटरसायकल वरून फिरून तसेच अनेक जणांचा ग्रुप करत सबंधित ठिकाणी बसून विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या टुकार रोड रोमिओंना बारामती वाहतूक शाखा व निर्भया पथकाने चांगलाच धडा शिकवलेला आहे,
सतत त्रास देणाऱ्या टुकार रोडरोमिंओं वर कारवाई करण्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी बारामती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निर्भया पथकाचे कामकाज पाहण्याबाबत आदेश दिले होते.
निर्भया पथकातील पोलीस अंमलदार आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बारामती शहरातील एम.ई.एस.हाईस्कूल , तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसर, सातव चौक तसेच फलटण चौकात मोहीम राबवून टुकार रोडरोमिओ मुले मोटर सायकलचा कर्कश आवाज करत महिलांना विद्यार्थिनींना त्रास देऊन सर्वांचे लक्ष विचलित करत फिरणारे व मोठमोठ्याने हॉर्न वाजवणारे तसेच शाळा आवारात ट्रिपल सीट फिरून मजनू गिरी करून मुलींना त्रास देणारे टवाळखोर बुलेट गाडीचा सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणारे ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी महिला मुलींच्या संरक्षणासाठी व त्यांना निर्भय बनवण्यासाठी शाळा महाविद्यालयात भेटी देत मार्गदर्शन करत जनजागृतीचे मोठे काम केलेले आहे तसेच बारामती शहरातील तक्रारी पाहता लागलीच त्यांनी या अनुषंगाने काम सुरू केले असून कारवाईचे सत्र सुरू केलेले आहे त्यामुळे महिला मुलींनी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत वाहतूक शाखेचे आणि निर्भर्या पथकाचे आभार मानलेले आहेत ही कारवाई बुधवारी आणि आज शनिवार दिनांक 29 मार्च असे दोन दिवस करण्यात आली तसेच यापुढे ही कारवाई सुरू राहील असे माध्यमांना बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, पोलीस अंमलदार वनिता कदम , सुनील धगाटे, वाहतूक शाखेचे पोलीस हवलदार सुधाकर जाधव, प्रदीप काळे , प्रकाश चव्हाण, सीमा साबळे , सविता धुमाळ, अजिंक्य कदम , रेश्मा काळे, माया निगडे, सुभाष काळे, योगेश कांबळे, स्वाती काजळे,रूपाली जमदाडे , अशोक झगडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की,फक्त तक्रार द्या तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच महिला व मुलींना कोणत्याही पुरुषांकडून काही त्रास होत असेल तर तात्काळ निर्भया पथकाकडील 9209394917 वरती तसेच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या 7777924603 या क्रमांकावर संपर्क साधावा संशयित व्यक्तीची माहिती असेल तर नाव त्याचे वर्णन त्याचा वाहन क्रमांक आणि कोणत्या परिसरात राहतो याबाबत माहिती मॅसेज करा तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल,तसेच स्थानिक पोलीस स्टेशन आणि निर्भया पथकाच्या मदतीने कारवाई करण्यात येईल.
संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांनी म्हटलेले आहे की, निर्भया पथकाचे काम आणखी प्रभावीपणे करण्यासाठी समन्वयक म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सूचित केलेले आहे महिला मुलींच्या संरक्षणासाठी योग्य मार्गदर्शन करून त्याबाबत अंमलबजावणी होईल नागरिकांनी पुढे येऊन या गोष्टीचा फायदा घ्यावा. तसेचसंजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग हे म्हणाले आहेत की,नागरिकांनी आपल्या तक्रारी असतील तर त्या भागातील संबंधित पोलीस ठाणे आणि निर्भया पथकाला कळवाव्यात नागरिकांनी केलेल्या कोणत्याही तक्रारींचे पारदर्शकपणे निरसन केले जाईल.