पुणे जिल्हा प्रतिनिधी
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळेच बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याचे चित्र आता पाहावयास मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची आज घोषणा केलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीची घोषणा केलेली आहे.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चार ते पाच जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची एकाच टप्प्यात नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे असा अंदाज बांधला जात होता परंतु शनिवारी दिनांक 30 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केवळ बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराची घोषणा केली तसेच बारामती लोकसभेची उमेदवारी अपेक्षे प्रमाणे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता बारामती मध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी रंगतदार लढत आगामी काळात पाहावयास मिळणार आहे या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार असल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे.