निपाणी प्रतिनिधी
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या(10मार्च ते 8एप्रिल) महिनाभराच्या कार्यकाळात धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंचा अति क्रूर असा पाशवी छळ करण्यात आला. फाल्गुन अमावस्येच्यादिवशी देहाचे तुकडे केले. या सर्वाला सामोरे जाण्यासाठी ईश्वराची साधना करताना बलिदान दिले. पण औरंगजेबासमोर शरणागती मात्र पत्करली नाही.
धर्मासाठी त्यांनी आपल्या प्राणांचा त्याग केला. म्हणूनच त्यांना धर्मवीर असे म्हटले जाते. संभाजीराजेंचा हा त्याग आजच्या युवापिढीने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. तरुणांनी देव, देश आणि धर्मासाठी त्यागाची तयारी ठेवली पाहिजे,शिवाजी महाराजांनी आम्हाला जगावे कसे हे शिकविले. तर संभाजी महाराजांनी त्यागाची भावना शिकवली. संभाजीराजेंनी मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर पाशवी छळ सहन केला, पण शरणागती मात्र पत्करली नाही, यांसाठी प्रत्येक गावांमध्ये धर्मवीर बलिदान मास पाळला गेला पाहिजे असे प्रतिपादन समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.
"शिरगुप्पी येथे विश्व हिंदू परिषद आणी शिव प्रतिष्ठान यांचा वतीने संभाजी महाराज बलिदान मासा कसे करावे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना स्वामीजी बोलत होते. यावेळी सागर श्रीखंडे यांनी बलिदान मास कसे पाळले जाते यांची माहिती दिली तसेच देव,देश,धर्म,संस्कृती ,आणी गोरक्षासाठी आजच्या तरुणांनी पुढे यावे असे आव्हान ही सागर श्रीखंडे यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणी धर्मवीर संभाजी महाराज यांचा प्रतिमाचे पूजन करण्यात आले. सुरवातील प्रेरणा मंत्र घेण्यात आली व सांगत ध्येय मंत्राने करण्यात आली तसेच या कार्यक्रमाला उपस्थित युवकांकडून देव, देश, धर्म रक्षणाची शपथ घेण्यात आली.
यावेळी शिरगुप्पी येथील ओम गणेश मित्र मंडळ,छत्रपती संभाजी महाराज तरुण मंडळ, शिवगणेश तरुण मंडळ,अवधूत फाउंडेशन,जगदंब तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ (बिच्चू ग्रुप ) या मंडळ चे तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच शिरगुप्पी ग्रामस्थ ही उपस्थित होते,