आळंदी परिसरात महाशिवरात्र परंपरेने साजरीआळंदी मंदिरात रुद्राभिषेख

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी 
           आळंदी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. महाशिवरात्रीला आळंदी पंचक्रोशीतील शिवमंदिरांत भाविकांची श्रींचे दर्शन,पूजेस मोठी गर्दी होती. भाविकांनी रांगा लावून श्रींचे दर्शन घेतले. हर हर महादेवाचे गर्जनेत शिवभक्तांनी मंदिरात गर्दी केली. मंदिर परिसरात गर्दी होवू नये याची दक्षता घेत रांगा लावण्यात आल्या होत्या.
            आळंदी मंदिर व्यवस्थापनाने भाविकांचे दर्शनाची चोख व्यवस्था ठेवली. मंदिरात भाविकांनी सुरक्षिततेत व्यवस्था करण्यात आली होती. वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने कीर्तन, गावकरी भजन, प्रमुख विश्वस्त विधितज्ज्ञ राजेंद्र उमाप यांचे हस्ते श्रींना रुद्राभिषेख, विविध मंदिरांत महाशिवरात्री निमित्त मंदिरात फुलांची तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. चऱ्होली बुद्रुक सह परिसरातील शिवमंदिर लक्षवेधी सजावटीने सजविण्यात आले होते. आळंदी पंचक्रोशीतील ठिकठिकाणच्या शिवमंदिरांत महाशिवरात्री निमित्त परंपरेने धार्मिक कार्यक्रम झाले. यात वडगाव घेनंद येथील पांडव कालीन पुरातन श्री महादेव मंदिर,चऱ्होली बुद्रुक येथील वाघेश्वर महाराज मंदिर, आळंदीतील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर, श्री वैतागेश्वर महाराज मंदिर, आळंदीतील श्री भैरवनाथ महाराज मंदिर, श्री तपनेश्वर महाराज मंदिर, श्री धनेश्वर महाराज मंदिर, श्री नागेश्वर मंदिर आदी शिवमंदिरांत परंपरेने धार्मिक कार्यक्रमात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.  
          आळंदी माऊली मंदिरासह श्री सिद्धेश्वर महाराज पुरातन शिव मंदिरात भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. माऊली मंदिरात परंपरेने पूजा, अभिषेख, कीर्तन, गावकरी भजन व रात्री संतोष मोझे यांचे वतीने हरी जागर आदि कार्यक्रम हरिनाम गजरात झाले.
             येथील भैरवनाथ महाराज मंदिरात श्रींना महिम्न व रुद्राभिषेख, गावकरी भजन, महानैवेद्य, भाविकांसाठी महाप्रसाद, हरी कीर्तन झाले. भाविकांना माऊली मंदिरात आळंदी शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांचे वतीने देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांचेसह उपस्थित मान्यवर यांचे हस्ते दूध महाप्रसाद वाटप झाले. यावेळी रोहिदास कदम, माऊली घुंडरे, गोविंद ठाकूर, दिनकर तांबे, सचिन शिंदे, पुजारीकाका देशपांडेआदी उपस्थित होते. भैरवनाथ मंदिर चौकात महाशिवरात्री निमित्त दूध महाप्रसाद हजारो भाविकांना वाटप करण्यात आला. महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. येथील श्री वैतागेश्वर महाराज मंदिरात देखील भाविकांनी दर्शनास गर्दी केली. गोपाळपुरातील श्री मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट चे वतीने भाविकांत भजन सेवा व महाप्रसाद वाटप करण्यात आले.
            महाशिवरात्री निमित्त द्वादशी दिनी तसेच परंपरेने इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट तर्फे इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता आणि महाआरती झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर यांचे हस्ते काका देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिनकर तांबे, रोहिदास कदम, ज्ञानेश्वर घुंडरे, महारुद्र हाके यांचेसह भाविक, पदाधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!