सणसवाडी प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिडगुले सणसवाडी (ता. शिरुर) येथील शिवम मंगल कार्यालय जवळ स्वामी समर्थ मंदिरात धार्मिक कार्यक्रम असल्याचे हजारो महिला या कार्यक्रमासाठी हजर असताना कुसुम दरेकर या महिलेच्या गळ्यातील गंठण चोरी गेल्याचे महिलेच्या लक्षात आल्याने त्यांनी आयोजकांना माहिती दिल्यानंतर आयोजक मुख्य गेट बंद करुन महिलांची चौकशी करत असताना सुनंदा सखाराम पावणे या महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला गेल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली मात्र यावेळी सर्व महिलांना दागिने तपासण्यासह सांभाळण्याचे आवाहन केले असता कुसुम काळूराम दरेकर व सुनंदा सखाराम पावणे यांच्यासह अजूनही रेणुका महेश कुऱ्हे, मनीषा आकाश नरोडे व चंद्रभागा भोगीलाल दरेकर महिलांचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले,
मात्र यावेळी अचानक एक महिला घाईघाईने पाठीमागे जाऊन भिंतीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल्याने अन्य महिलांनी त्या महिलेला पकडले असता तिला एक इसम मदत करत असल्याचे दिसले मात्र यावेळी त्या महिलेसह इसमाने महिलांचे दागिने चोरून त्यांच्या साथीदारांकडे दिले आणि त्यांचे साथीदार फरार झाल्याचे उघड झाल्याने, याबाबत कुसुम काळूराम दरेकर वय ४९ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सुनित्रा जयाजी मिसाळ व जयाजी सूपडाजी मिसाळ दोघे सध्या रा. कासारी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. दुधड ता. संभाजीनगर जि. संभाजीनगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहे.
या चोरीत ५ महिलांचे दागिणे लांबवले म्हणजे किमान६-७ जणांची सराईत टोळी असावी. पकडलेली महिला चोर गर्दीत रेटारेटी करत असलेली काही महिलांनी पाहिल्याचे सांगितले जाते.पैकी एक पळून घामाघूम झालेले जोडपे चालू ट्राफीक मधून रोड क्रॉस करून औरंगाबादकडे गेल्याचे समजते . पकडलेल्या जोडीच्या खात्यात पुर्वी लाखो रुपये होते तरी त्यांच्याजवळ साधाही मोबाईल नाही सांगतात ही विसंगती असून मोबाईल रेकॉर्ड वरून गुन्हेगार व चोऱ्या पकडल्या जातात हे सराईत चोरांना ज्ञात झाल्याने असला तरी ते जवळ ठेवत नाहीत हे पोलीसांची दिशाभूल करण्यासाठीच हे न कळण्या ईतके भोळे पोलीस नक्कीच नाहीत.पण 'कानूनके हात लंबे होते है 'म्हणतात तसे चोरांनी दागीने औरंगाबाद जवळील त्यांचे गावाकडे लांबवले असले तरी या चोरांचा शोध शिक्रापुरचे कार्यक्षम तरुण तडफदार पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार वेरणनाथ मुतनवार लावतील असा आशावाद समाज मानसात आहे. पकडलेल्या संशयितांवर गुन्हा दाखल करून शिरूर न्यायालयात हजर केले असता पुढील इतर सर्व बाबी तपासासाठी दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली.