नुकताच भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती (आयएएस) , एनएसएसइ व मंथन या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंग्रजवाडी मधील कु.पियुष दिलीप धुमाळ याने तीनही परीक्षांमध्ये राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत घवघवीत यश संपादित केले.
भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती (आयएएस) परीक्षेत २७२ गुण प्राप्त करत राज्य गुणवत्ता यादीत ११वा,एनएसएसई परीक्षेत २०० पैकी १९६ गुण प्राप्त करत गुणवत्ता यादीत ३रा तसेच राज्यस्तरीय मंथन परीक्षेत ३०० पैकी २८० गुण प्राप्त करत गुणवत्ता यादीत ११ वा आला. शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र व सन्माचिन्ह यास पियुष पात्र असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे व मार्गदर्शक शिक्षिका अनुराधा बेंडभर यांचे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष,सदस्य, मुख्याध्यापक सूर्यकांत काळे व ग्रामस्थ यांनी कौतुक केले.