ड्रायव्हिंग लायसंन्स सबंधी नवीन नियम लागू ; अंमल बजावणी येत्या १ जून पासून

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
            ड्रायव्हिंग लायसंन्स काढण्यासाठी बऱ्याच किचकट अशा प्रक्रियेतून जावे लागते. यामध्ये वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी परीक्षा ही द्यावी लागते. तसेच सर्व प्रक्रियेत हमखास एक आठवडा तरी नक्कीच निघून जात असतो.परंतु आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे. कारण की, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसंन्स बाबतच्या नियमात मोठे असे बदल केलेले आहेत. या नियमानुसार, आता आरटीओ कार्यालयात जाऊन व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज आता पडणार नाही.
जून २०२४ पासून आरटीओ लाइसंन्ससबंधी नविन नियम लागू होणार
मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी संस्थांना चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंगलायसंन्स देऊ शकतात. हा नियम येत्या १ जून २०२४ पासून लागू होणार आसून.तसेच नव्या नियमानुसार, वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर चालकाला एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंचा दंड भरावा लागू शकतो. तसेच एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला पंचवीस हजार रुपया पर्यंत दंड हा भरावा लागू शकतो.इतकेच नव्हे तर, ज्या व्यक्तीचे वाहन आहे त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाऊ शकते. या नियमानुसार वयाच्या २५ वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढताच येणार नाही. 
            यासह खाजगी दुचाकी वाहन चालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान १ एकर जमीन असायला हवी. तर मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे २ एकर जमीन असायला हवी. याबरोबरच वाहन चालकाच्या चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे असायला हव्यात असे या नवीन नियमात म्हटलेले आहे.
          तसेच, प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षकांकडे हायस्कूल डिप्लोमा गरजेचे असेल. तसेच त्यांच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबधित सर्व माहिती असायला हवी. या सर्व बाबी तपासूनच प्रशिक्षकाची निवड केली जावी. या सर्व नियमांमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच पालकांचा लहान मुलांकडे गाडी देण्याचेही प्रमाण कमी होईल, अशी आता शक्यता वर्तवली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!