जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे दिवसा माणसावर हल्ले चार दिवसात दोन जणांचा मृत्यू

Bharari News
0
जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे दिवसा मानसावर हल्ले चार दिवसात दोन जणांचा मृत्यू
वन्यजीव प्राणी कायदा रद्द करा शेतकरी संघटनेच्या रघुनाथ दादा पाटलांची मागणी

जुन्नर प्रतिनिधि 
     जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालले असताना सरकार मात्र याकडे कुठल्याही गांभीर्याने बघत नाही काळेवाडी या ठिकाणी रुद्र फापाळे (वय आठ वर्ष) याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्राचे अनेक नेते जुन्नर तालुक्यात येऊन गेले परंतु या कुटुंबाला भेट दिली नाही परंतु वर्तमानपत्रातून ही बातमी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांना कळल्यानंतर त्यांनी काळवाडी या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जाऊन कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा हा रद्द करावा अशी मागणी देखील त्यांनी या ठिकाणाहून सरकारकडे केली केली आहे.
             रघुनाथ दादा पाटील हे जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला भेट देण्यासाठी येत असतानाच त्यांच्यासमवेत तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ यांना मोबाईल द्वारे पिंपरी पेंढार या ठिकाणी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने महिलेवर हल्ला केल्यामुळे त्यात ती महिला मृत्यू पावल्याची बातमी कळली आणि रघुनाथ दादा आपल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह लगेचच घटनास्थळी धाव घेऊन जय कुटुंबाची भेट घेतली 
            वारंवार अशा घटना घडतच राहिल्या तर शेतकऱ्याने जगायचं कसं केंद्र सरकार वरच्यावर म्हणून पट्टी करून पीडित कुटुंबाला पैसे देऊन गप्प बसवण्याचे काम करीत आहे परंतु माणूसच राहिला नाही तर पैशाचे करायचं काय आहे सवाल त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला बिबट्याची नसबंदी त्यावर कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही त्याकरता वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा हा रद्द झाला पाहिजे त्यानंतरच बिबट्यांची संख्या नियंत्रणात येऊ शकते या पुढील काळात सरकारने कुठली ठोस पावलं न उचलल्यास शेतकरी संघटना भविष्यामध्ये याविषयी अखंड महाराष्ट्रभर जनजागृती ला सुरुवात करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले त्यांच्या समवेत शिवाजी नाना नांदखिले वस्ताद दौंडकर माऊली डोमे संजय भुजबळ सचिन थोरवे आणि असंख्य शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यासमवेत उपस्थित होते,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!