पुण्यामध्ये संतापजनक प्रकार ; आईचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या केअरटेकर वर अतिप्रसंग

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
               पुणे येथील घटना आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी केअरटेकर म्हणून घरी कामाला असलेल्या तरुणीला बिअर पाजून बलात्कार करणाऱ्या शेअर मार्केट व बांधकाम काॅन्ट्रक्टर ची काम करणाऱ्या प्रवीण बंब याला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यामधील मार्केटयार्ड परिसरातील आपल्या राहत्या घरी आणि खडकवासला येथील लॉज वर या भामट्याने हि कृत्ये केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
             आई-वडील व आजीच्या निधनानंतर आपल्या मामाकडे राहणाऱ्या एका केअरटेकर तरुणीला बिअर पाजून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडलेली आहे. या प्रकरणी तीव्र संताप लोकांमधून व्यक्त होत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील एका २४ वर्षीय तरुणीचे आई-वडिलांचे अपघातात निधन झाले होते. त्यानंतर तिचा सांभाळ आजी करत हाेती. परंतु काेराेना काळात आजीचे देखील निधन झाल्याने तिचा सांभाळ चुलत मामा करु लागला. याचदरम्यान, पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात एका कुटुंबातील महिलांचा सांभाळ करण्यासाठी तिने केअर टेकरची नाेकरी एजन्सीच्या माध्यमातून स्विकारली आहे. मात्र सदर कुटुंबातील व्यक्तीने तिला जबरदस्तीने एका लाॅजवर नेऊन मारहाण करत बिअर पाजली आणि तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आहे.
            याबाबत पिडित तरुणीने स्वारगेट पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आराेपी प्रवीण बंब (वय ४५ वर्ष, रा.मार्केटयार्ड, पुणे) यास पाेलिसांनी अटक केली आहे. सदरचा प्रकार हा एप्रिल २०२४ ते ११ मे २०२४ हया दरम्यान सिंहगडराेड खडकवासला धरणाच्या पुढील एका लाॅजमध्ये तसेच आराेपीच्या राहत्या घरी घडलेला आहे.पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी प्रवीण बंब हा शेअर मार्केट व बांधकाम काॅन्ट्रक्टर ची कामे क रताे. त्याची आई आजारी असल्याने घरी बेडवर झाेपून असते, तर पत्नी देखील आजारपणाने ग्रस्त आहे. त्यामुळे आईचा सांभाळ करण्यासाठी त्याने एका केअर टेकर एजन्सी यांचेशी संपर्क साधून पिडित तरुणीला कामासाठी चार महिन्यापूर्वी ठेवले हाेते.
             आराेपीने घरी पत्नी नसताना, तिला हाताला धरुन ओढून जबरदस्तीने त्याच्या बेडरुममध्ये नेऊन तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत काेणाला काही सांगू नकाे नाहीतर तुझा गळा दाबून तुला मारुन टाकीन अशी धमकी देखील दिली.त्यानंतर पुन्हा आरोपी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला चल आपण मस्त मज्जा करु, असे म्हणाला. त्यावर तरुणीने तुम्ही माझ्या वडिलां सारखे असून, तुम्हाला माझ्यासारख्या मुलीही आहेत, तरीही तुम्हाला असे बोलण्यास लाज वाटत नाही का? असे प्रत्युत्तर दिले. यामुळे आरोपीने तरुणीला कारमध्ये बस नाहीतर मी तुला ठार मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर तिला घेऊन तो सिंहगडरोड ने खडकवासला धरणाच्या पुढे एका लॉजवर घेऊन गेला. तिथे तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिला बिअर ही पाजली. तसेच कुणाला काही सांगितले तर जीवे मारेन अशी धमकीही दिली. याबाबत पुढील तपास स्वारगेट पाेलिस करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!