महिला पोलीसाला गुंगीचे औषध देऊन सहकारी पोलीसाकडूनच तिच्यावर बलात्कार

Bharari News
0
पुणे जिल्हा प्रतिनिधी
               लॉकडाऊन च्या काळात ओळख वाढवून जेवणास घरी येऊन पोलीस शिपायाने कोल्ड्रींक मधून महिला पोलीस कर्मचाऱ्याला गुंगी येण्याचे औषध दिले.महिला पोलीस कर्मचारी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला तसेच त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. 
              त्यानंतर पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन बऱ्याच वेळा अत्याचार केले आहेत. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून पीडित महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. अखेर पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केलेली आहे.
               याप्रकरणी खडक पोलिसांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलीस नाईक दिपक सिताराम मोघे या पोलीस कर्मचार्‍यावर आयपीसी ३०७, ३७६/२/एन, ३७७, ३९२, ५०६/२, ५०४, ३२३ सह आर्म ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजिस्टर नंबर २९४/२०२३) नुसार दिली आहे. हा प्रकार पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडलेला आहे.आरोपी दीपक मोघे हा अटक टाळण्यासाठी फरार झालेल होता.
                तसेच त्याच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन त्याला पोलीस दलातून निलंबित केले होते. तसेच आरोपीने सत्र न्यायालय, उच्च न्यायालय येथे वेळोवेळी जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, खडक पोलिसांनी आरोपीच्या विरोधातील भक्कम पुरावे न्यायालयात सादर करुन त्याच्या जामिनाला विरोध केल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आरोपी सापडत नसल्याने न्यायालयाने आरोपीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता.
                जामीनासाठी सर्व मार्ग बंद झाल्याने आरोपी दिपक मोघे हा १० मे २०२४ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिवाजीनगर पुणे एन.एच.बारी यांच्या कोर्टात हजर झाला. न्यायालयाच्या आदेशावरुन आरोपीला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी.आर. डोनालपल्ले यांच्या कोर्टात हजर करुन पोलीस कोठडी घेतली आहे.
            पुढील तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार ह्या करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!