बारामती येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे विविध मागण्यांसाठी किरण साठे यांचे बेमुदत अमरण उपोषण

Bharari News
0
पुणे जिल्हा संजय चांदगुडे
            माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे जबाबदार असतील असे माध्यमांना बोलताना किरण साठे यांनी म्हटले आहे.
              २७ जून पासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,छत्रपती शाहू महाराज,साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे,अहिल्यादेवी होळकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात यावा.

तसेच राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेमधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. तसेच कागदपत्रे पूर्ण असणाऱ्या लाभधारकांचे नाव देण्यात यावे तसेच घरकुल मंजूर करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात यावा.

अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यवसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्व तयारीसाठी २ लाख रुपयांची अनुदान देण्याची योजना तात्काळ सुरू करण्यात यावी. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च शिक्षण मुलींना मोफत करणार आसल्याची घोषणा मोठया दिमाखात केली होती,त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्यात यावी. 

या मागण्यांसाठी येत्या अधिवेशनातील अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करण्यात यावी यासाठी पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढण्यात आली होती. तसेच ह्या मागण्या मान्य न झाल्यामुळे दि.२७ जूनपासून बेमुदत अमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. हे उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!