सुनील भंडारे पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वखारीचा मळा वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील मुख्याध्यापक प्रदीप ढोकले यांनी समाज माध्यमाचा प्रभावी वापर करत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच शाळेसाठी फेसबुक व व्हाट्सअपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींकडून वस्तूरूपाने भरघोस स्वरूपात मदत मिळवली.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी शिल्पा मेनन मॅडम तसेच मनिषा जोंधळे, विद्या धन्वंतरी, आशिष राठी, प्रवीण समगे पाटील, सुधाकर जनवाडे, रुपेश तडके व मनोज देशमुख या सर्वांनी मिळून वखारीचा मळा शाळेस एक व्हाईट बोर्ड (४ x ६) व कॉम्प्युटर स्पीकर भेट दिला. तसेच शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक सॅक, कंपास पेटी व ६ वह्यांचा एक संच वाटप करण्यात आला. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स, कॅडबरी, बिस्किट्स व लाडूची मेजवानी देण्यात आली. नवीन शैक्षणिक वर्षात शालेय साहित्य मिळाल्याने मुले भलतीच खुश झाली.शिक्षणानेच आपला खऱ्या अर्थाने विकास होतो. आपली जडणघडण होते व सकस विचारांची बैठक तयार होते, असे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी शिल्पा मेनन मॅडम यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थी व पालकांशी सकारात्मक संवाद साधत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश शिवले यांनी शाळेच्या भौतिक सुविधेसाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विजय शिवले, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिवले व किरण शिवले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नवनाथ शिवले, नामदेव शिवले, योगेश शिवले, अक्षदा शिवले, प्रियंका शिवले, रेखा शिवले, रूपाली शिवले, वैशाली शिवले, राणी शिवले, अनिता शिवले, सुनिता शिवले तू मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
शाळेतील सहशिक्षक भाऊसाहेब ठोंबरे यांनी
उपस्थितांचे आभार मानले.