लोणी काळभोर सचिन सुंबे
संत निरंकारी सत्संग भवन मांजरी बुद्रुक येथे पुणे झोन अंतर्गत आव्हाळवाडी सेक्टरच्या वतीने मांजरी बुद्रुक, आव्हाळवाडी, लोणी काळभोर, उरुळी कांचन, केशवनगर,हिंगणगाव,वाडे बोल्हाई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले .या मध्ये १६१ युनिट रक्त संकलित करण्यात आले. या मध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, यांनी रक्त संकलीत करण्यात आले,
या रक्तदान शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी, (पुणे झोन प्रभारी) यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सुरेश आण्णा घुले ( राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, पुणे मध्यवर्ती बँक संचालक), अजित आबा घुले ( राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस) उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक,राजकीय,शासकीय अधिकारी-पदाधिकारी यांनी आवर्जून भेट दिली.
रक्तदान शिबिराच्या जनजागृती साठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक, तसेच सेवादल यांनी पथनाट्य, रॅलीचे आयोजन लोणी काळभोर, मांजरी,आव्हाळवाडी परिसरात केले होते.या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मांजरी बुद्रुकचे मुखी रोहिदास घुले यांनी मानले. (क्षेत्रीय संचालक अवनीत तावरे, तसेच आव्हळवाडी सेक्टर संयोजक दत्तात्रय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवादलानी आपले योगदान दिले. रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुणे झोन मधील आव्हाळवाडी सेक्टरचे संयोजक,मुखी,संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन च्या स्वयंसेवकांनी योगदान दिले.