कराड प्रतिनिधी
येणाऱ्या काळात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल. तसेच राज्यात देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल. लोकसभा निवडणूकी नंतर अजित पवार गटाचे जवळपास १९ आमदार परतीच्या वाटेवर आहेत. तसेच ११ ते १२ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा गौप्यस्फोट शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कराड येथे केला आहे.
यावेळी त्यांनी एकंदरीत साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा विजय झाला. त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, पक्ष त्यांचा हा विजय स्वीकारत नाही. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावून त्यांचे तत्व आत्मसात केले जाऊ शकत नाहीत त्यासाठी संघर्ष करावा लागतो, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता भाजपला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या लोकसभेतील मोठ्या यशानंतर आ. रोहित पवार यांनी आज कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी येऊन अभिवादन केले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच आमदार बाळासाहेब पाटील, यु्वा नेते सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सत्यजित पाटणकर, प्रशांत यादव, मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार बटाणे,जशराज पाटील, सौरभ पाटील आदिजन यावेळी उपस्थित होते. यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत की, अजित पवार राष्ट्रवादीत आता एकटेच राहतील बाकी 12 ते 13 जण भाजपसोबत जातील आणि उर्वरित आमदार आमच्या सोबत येतील. याबाबत लवकरच कळेल. साताऱ्यात आमचा उमेदवार हा विजयी झाला असता, तो निवडून येणारच, या विचारात व विश्वासात आम्ही होतो. परंतू आम्ही येथे गाफील राहिल्याने आमच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे याचे आम्ही आत्मचिंतन आम्ही करणार आहोत की आम्ही कोठे कमी पडलो आहे.