सातारा जिल्हयात पोलीस अधिक्षकांकडून कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने कलम ३६ लागू

Bharari News
0
सातारा प्रतिनिधी
           सातारा जिल्ह्यात दिनांक ६ जून २०२४ रोजी शिवराज्यभिषेक दिन व दि. १७ जून २०२४ रोजी बकरी ईद हे सण साजरे होणार आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यात मिरवणूकांचे आयोजन केले जाण्याची शक्यता असल्या कारणाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे, तसेच मिरवणुकीतील व कार्यक्रमातील व्यक्तींचे वर्तन कसे असावे आणि ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन होऊन लाऊड स्पिकरचा वापर योग्य प्रकारे व्हावा याकरिता निर्बंध घालण्याकरिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ नुसारचे अधिकार दि. १९ जून पर्यंत कालावधीकरिता पोलीस अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांना प्रदान केले आहेत. या विषयी चे आदेश पोलिस अधिक्षक शेख यांनी निर्गमित केले आहेत.
 अधिक माहिती अशी आहे की, बकरी ईद सणाच्या अनुषंगाने उघड्या वाहनातून मांसाची विक्री करु नये, सार्वजनिक ठिकाणी जनावरांची कत्तल करु नये, तसेच उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रार्थना स्थळांच्या आजुबाजुस हाडे/मांस टाकु नये, या विषयी निर्देश देणे. रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकी मधील किंवा जमावामधील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वागणूक किंवा वर्तणूक कशी ठेवावी, या विषयी निर्देश देणे

अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल.

अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यांवर किंवा धक्क्या मध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी कायदा व सुव्यवस्था राखणे साठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यांजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्य वाजविणे यांचे विनिमयन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे बाबत.

कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागे जवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा  उपयोग करणेचे विनियमन करणे, व त्यावर नियंत्रण ठेवणे साठी योग्य ते आदेश देणे, सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधि नियमांचे कलम ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य ते आदेश देणे यांचा यामध्ये समावेश आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!