पुणे जिल्हा प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील म्हसोबाचीवाडी येथे पावसाचे आगमन दिनांक ६ जून रोजी झाले असून, कडक उन्हामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना काही प्रमाणात आता दिलासा मिळाला आहे. तसेच या अचानक आलेल्या पावसामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.
तसेच यावेळचा उन्हाळा फारच तापदायक झालेला होता. तापमानाचा पारा ४२°C पर्यंत गेल्याने तसेच उकाड्याने हैराण झालेल्या वयोवृद्ध व्यक्तींना व नागरीकांना झालेल्या पाऊसामुळे थंडगार गारवा मिळाला आहे. उद्या दिनांक ७ जून रोजी मृग नक्षत्राचे आगमन होणार असून, यामुळे खऱ्या अर्थाने पावसाळ्याची सुरुवात होणार आहे. यावेळेस जेवढा उन्हाळा तापदायक झाला होता तेवढ्याचं प्रमाणात पाऊस देखील होणार असल्याचे अंदाज तज्ञांनी व्यक्त केले आहेत.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात खडकवासल्याच्या पाण्यासाठी नुकतेच आंदोलन झाले होते. याच आंदोलनामुळे इंदापूर तालुका हद्दीत खडकवासला धरणाचे पाणी काल रोजी पोहचले आहे. तसेच आज रोजी पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत त्यामुळे शेतकरी राजा हा कमालीचा आनंदी झाला आहे. तसेच उजनीच्या पाणी पातळीत कमालीची घट झालेली असून काहीसा चिंतेत असलेला शेतकरी राजा पावसाच्या आगमनाने सुखावला गेला आहे. आणि या पावसाने माझ्या शेतकरी राजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.