सुनील भंडारे पाटील
मराठा आरक्षणाला विलंब लागत असल्याने राज्यामध्ये मराठी समाजामध्ये असंतोष असून पुण्यामध्ये प्रसाद देठे या व्यक्तीने आत्महत्या केल्याने संपूर्ण पुणे सह राज्य हादरले, देठे यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज पुणे लोणीकंद येथील रामनगर मध्ये राहत्या घरी भेट घेतली,
देठे यांनी तीन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिले, देठे यांच्या या निर्णयाने त्यांचे संपूर्ण कुटुंब उघडे पडले असून, त्यांना तीन मुले आहेत, ही मुले अजून शिक्षण घेत आहेत, देठे यांच्या कौटुंबिक परिस्थितीची प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज शुक्रवार ता 21 रोजी कुटुंबीयांची भेट घेतली, यावेळी त्यांनी देठे यांचा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली असून मुलांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च, मुलांची लग्न होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी घेतली, त्याचप्रमाणे पाच लाखांचा धनादेश कुटुंबाला सुपूर्त करण्यात आला, त्याचप्रमाणे आरक्षणासाठीची कायदेशीर कारवाई चालू असून मराठा तरुणांनी कृपा करून असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले, यावेळी तानाजी सावंत यांना अश्रू अनावर झाले,
प्रसाद देठे यांच्या पत्नी यांनी अश्रू आवरत प्रसाद देठे यांनी मराठा आरक्षणासाठी पाच वर्षे दिलेला लढा याविषयी चर्चा केली, तसेच राज्य सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षण द्यावे अशी विनंती केली, याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर घाडगे, लोणीकंद च्या सरपंच मोनिका कंद, उपसरपंच राहुल शिंदे, माजी उपसरपंच गजानन कंद, मोठ्या संख्येने मराठा जनसमुदाय उपस्थित होता,