कदमवाक वस्ती येथील पालखी तळावरील पहिल्या मुक्कामाची उत्सुकता शिगेला लोणी काळभोर येथील मुक्कामाची परंपरा खंडित झाल्याने भाविकांची नाराजी

Bharari News
0
लोणी काळभोर सचिन सुंबे
             जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या कदमवाक वस्ती येथील पालखी तळावरील पहिल्या मुक्कामाची उत्सुकता शिगेला पोहचली असुन त्यासाठी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सज्ज झाली आहे . प्रशासनाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कुठल्याही परिस्थितीत वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे ,
              लोणी काळभोर येथील मुक्कामाची अनेक वर्षाची परंपरा खंडित झाली असून लोणी काळभोर येथील नागरिकांना याची हुरहुर नक्कीच लागली आहे .पालखीतळावरील आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सज्ज असून पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम असल्याची टप्प्यात आली माहिती नवपरीवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी दिली.                संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी यंदा लोणी काळभोर ऐवजी कदमवाकवस्ती येथील सुमारे सोळा एकर प्रशस्त जागेत मुक्कामी आहे. त्यातील तीन एक जागेवर अतिक्रमणे आहेत .गेल्या पंधरा दिवसापासून कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने जोरदार तयारी सुरु आहे. या ठिकाणावरील खड्डे बुजवून त्या ठिकाणी मुरम टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे.पावसाचे पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.                 मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सोहळा कालावधीत वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकिय सुविधा २४ तास उपलब्ध करुन देण्यात येणार असून फिरता दवाखानाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालखी मुक्काम, विसावा, स्वागत कक्ष आणि पालखी मार्गावर योग्य त्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. सोयीसुविधांचे नियोजन करण्यात आले आहे . ठिक ठिकाणी दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. 
           पिण्याचे पाणी, तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी रुग्णवाहिका तसेच पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. वारक-यांकरिता पुरविण्यात येणा-या सुविधां संदर्भातील फलक लावण्यात येणार आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहे.
            याव्यतिरिक्त, वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी योग्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे .पालखीच्या मार्गावर , मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी साफसफाई, जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे.
               यावेळी माजी सरपंच गौरीताई गायकवाड , उपसरपंच नासीर पठाण ,माजी उपसरपंच व विदयमान ग्रामपंचायत सदस्या राजश्रीताई काळभोर ,सदस्य अविनाश बडदे ,तंटामुक्तीचे अभिजित बडदे , ग्रामसेवक अमोल गुळवे सामाजिक कार्यकर्ते उदय काळभोर ,संजय कदम ,शशी पाटील ,मकरंद काळभोर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .

आमदार अशोक पवार यांनी केली पाहणी 
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पालखीतळाची पाहणी करून पालखीतळाचा मास्टर प्लॅन करणार असल्याचे सांगितले. यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान , वारकऱ्यांसाठी मोठे शेड ,सुरक्षा भिंती वाढवणे , ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्क करणे , जॉगिंग ट्रॅक इत्यादींचा समावेश त्यामध्ये करण्यात येईल .तसेच वारीतील दिंडी प्रमुखांशी बोलुन त्यांना काय सुविधा पाहिजे याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे . शासनातर्फे जास्तीत जास्त निधी या पालखीतळासाठी आणणार असल्याचे सांगितले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट )पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे , राष्ट्रवादी काँग्रेसची हवेली तालुका अध्यक्ष संदीप गोते ,कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिर पठाण , सोरतापवाडी ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी ,सामाजिक कार्यकर्ते प्रीतम काळभोर ,उदय काळभोर आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!