सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यातील अवैध गौण खनिज दगड खान व्यवसायात होणारा काळाबाजार थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु दगडखान उद्योजकांच्या मार्फत मोठे षडयंत्र रचून संबंधित भरारी पथक रद्द करण्यात आले होते, परंतु संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल देण्याचे पत्र काढले आहेत,
भरारी पथकाच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी शासनाची होणारी कोट्यावधी रुपयांची फसवणूक, तसेच आजूबाजूची शेती, नागरिकांना होणारा त्रास यासाठी युद्ध पातळीवर धडाकेबाज कारवाई चालू केली होती, परंतु या सर्व गोष्टी चुकीच्या मार्गाने हाणून पाडण्यात आल्या, हे सर्व पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, दगड खान उद्योजकांनी संप पुकारून तसेच इतर मार्गाचा वापर करून संबंधित भरारी पथक रद्द करण्याची योजना आखली व ती पूर्णत्वास नेली,
समाजात होणार हा अन्याय व वाचा फोडण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी आज 9 तारखेला तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली, तसेच जिल्हास्तरीय भरारी पथक रद्द केल्याची चौकशी तातडीने करून त्वरित कार्यवाही करुन त्याचे उत्तर तक्रारदार संभाजी ब्रिगेड यांना अवगत करावे असे आदेश जिल्हाधिकारी यानी काढले आहेत, या आदेशामुळे पुन्हा अवैध दगड खडीखान उद्योजकांचे धाबे दणाणतील,