जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री , पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु विद्यालयामध्ये वृक्षारोपण,1000 सीडबॉल निर्मिती , प्लॅस्टीक संकलन , हस्तकला , चित्रकला , रांगोळी प्रदर्शन, गरीब विद्यार्थी सहाय्यता निधीतून गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप असे विविध शालेय उपक्रम विद्यालयात राबविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरोली बु गावचे सरपंच प्रदीपदादा थोरवे उपस्थित होते व उपसरपंच वैशाली थोरवे, शिरोली बु गावचे पोलीस पाटील अमोलजी थोरवे, शाळेचे फॅमिली डॉक्टर भिवसेन राऊत, तंटामुक्तीचे अध्यक्ष नितीनजी विधाटे , शालेय समितीचे अध्यक्ष सुनिल विधाटे शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे ,पर्यवेक्षिका अनघा घोडके , विद्यालयाचे सांस्कृतीक विभाग प्रमुख अय्यर सर ,हरितसेना विभागप्रमुख देवकुळे सर ,जेष्ठशिक्षक शिंदे सर व कवडे मॅडम , विद्यालयाचे जेष्ठ लिपीक सांगडे सर उपस्थित होते .गरीब सहाय्य निधी विभाग प्रमुख मोरे सर यांनी गरीब गरजू मुलांना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी आपल्या वाढदिवसाच्या प्रितर्थ काही निधी गरीब सहाय्य निधीस दिला व त्या रकमेतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.
शिक्षणप्रेमी ग्रामस्थांकडून आणि इ 9 वीच्या वर्गांकडून सर्व शिक्षकांचे गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाबपुष्प व पेन देवून त्यांचा सत्कार करण्यात आले व विद्यार्थ्यांची त्या प्रसंगी गुरुपौर्णिमे निमित्त आपली मनोगत व्यक्त केली . विरणक यांनी विद्यालय आणि शेजारील परिसर या ठिकाणी प्लॅस्टिक गोळा करून एकत्र संकलन केले. रांगोळी विभागाचे कामकाज सर्व महिला शिक्षक यांनी पाहिले यात स्काऊट गाईड विभाग प्रमुख मुंढे मॅडम नलावडे मॅडम , भौरले मॅडम , पादीर एस बी , कविता ढेरेंगे मॅडम यांनी सहभाग घेतला तर हस्तकला विभागाचे काम गायकवाड व खेडकर जे जी , यांनी पाहिले , तर चित्रकला प्रदर्शन विभागाचे काम पाटोळे सर , नलावडे सर यांनी पाहिले . कार्यक्रमाचे निवेदन निधन टी पी सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार विज्ञान विभागाच्या पादीर पीडी यांनी मानले.