सुनील भंडारे पाटील
बुर्केगाव (तालुका हवेली) येथे किरकोळ भांडणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पतीला अटक केली आहे, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
गावामधील भैरवनाथ मंदिराच्या शेजारी राहत असलेल्या या कुटुंबामधील पत्नी लक्ष्मीबाई बाबा जाधव वय (45 वर्षे) व पती बाबा मारुती जाधव वय (55 वर्षे) या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर रागात बाबा याने लक्ष्मीबाई यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीचे घाव करून डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत केल्याने लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला, ही घटना आज मंगळवार तारीख 23 रोजी सकाळी पहाटे 4 च्या सुमारास घडली असून आरोपीने स्वतः ही माहिती पोलिसांना दिली,
घटनास्थळी लोणीकंद पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आला आहे, पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत,