वाघोली प्रतिनिधी
लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या काठी सायंकाळी चोरून चालू असलेल्या कल्याण मटक्यावर लोणीकंद पोलीस पथकाने छापा टाकून चार जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अनिकेत काळुराम ढसाळ (रा. त्रिवेणीनगर, तुळापुर ता. हवेली जि. पुणे), सुदाम बाबाजी वामन (रा. थोरवे वस्ती, आळंदी ता. हवेली जि पुणे), राहुल अंकुश शिवले (रा. तुळापुर ता. हवेली, जि. पुणे), संतोष आत्माराम आरण्य (रा. दिघी, भोसरी पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवारी (दि. १६ जुलै) तुळापुर येथे इंद्रायणी नदीकाठी चोरुन कल्याण मटका चालू असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस नाईक रितेश काळे यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व स्टाफने सायंकाळी सदर ठिकाणी मटका चालवणाऱ्यांवर छापा टाकला. यामध्ये मटका चालवणारे दोन इसम व मटका खेळणारे दोघे मिळुन आले. त्यांचेकडुन रोख रक्कम, मोबाईल व मटका खेळण्याचे साहित्य असा एकुण २१ हजार ४२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अंमलदार कुणाल सरडे यांचे फिर्यादीवरुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे शहर अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त विजय मगर, सहा. पोलीस आयुक्त विठ्ठल यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार रितेश काळे, अमोल ढोणे, कुणाल सरडे यांनी केली आहे.