आळंदीत क्रांतिकारकांच्या दोन हजार छायाचित्रांचे प्रदर्शनास प्रतिसाद

Bharari News
0
आळंदीत क्रांतिकारकांच्या दोन हजार छायाचित्रांचे प्रदर्शनास प्रतिसाद 
१५ ऑगस्ट दिनी माऊली मंदिरात लक्षवेधी उपक्रम उत्साहात  
आळंदीकरांनी लुटला देशभक्तीचा आनंद 

आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर 
               स्वातंत्र्य दिनी आळंदी मंदिरात २००० क्रांतिकारकांचे छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. याचा आनंद होत आहे. यापुढे असेच अधिक प्रशस्त जागेत अतिशय उत्तम प्रदर्शन पुन्हा भरवावे. त्यास सर्वोतोपरी सहकार्य आळंदी देवस्थान करेल अशी ग्वाही सर्व क्रांतीकारकांच्या त्यागाच्या देश सेवेच्या भूमिकेस वंदन करीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांनी दिली. 
              देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने प्रणित कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे अंतर्गत ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांती मंदिर’ असे ९४८ दिवसांच्या परिक्रमेंतर्गत २ हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे मोफत प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी जनहित फाउंडेशन, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन यांचे वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदशन करताना योगीजीं बोलत होते. 
              या प्रसंगी देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, ग्यानज्योत इंग्लिश स्कुल संचालिका कीर्ती घुंडरे पाटील, शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया मराठवाडा विभाग अध्यक्ष रवींद्र जाधव, सोशल मीडिया प्रमुख वैभव दहिफळे, बाबासाहेब भंडारे, राजेश नागरे, आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण, शाखा प्रमुख रोहिदास कदम, अमर गायकवाड, सोमनाथ बेंडाले, रामदास दाभाडे,पोलिस मित्र युवा महासंघ अध्यक्ष प्रवीण बोबडे, ज्योती पाटील, रामचंद्रकाका कुऱ्हाडे, दिनकर तांबे, गोविंद तौर आदी मान्यवर उपस्थिती होते. 
              मोफत प्रदर्शनास हजारो भाविक, वारकरी, नागरिक आणि दर्शनार्थी यांनी भेट देऊन क्रांतिकारकांच्या दोन हजार छायाचित्रांचे प्रदर्शनास प्रतिसाद देत आपले अभिप्राय उत्स्फुर्द पणे नोंदविले. प्रदर्शनाचे उद्घाटन १५ ऑगस्ट दिनी माऊली मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख श्री योगी निरंजन नाथजी यांचे हस्ते झाले. देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने लिखित १०,००० क्रांतिकारकांची माहिती देणारा देशभक्तकोश तसेच २००० क्रांतिकारकांच्या छायाचित्राचे प्रदर्शन व अन्य दुर्मिळ डिजिटल ठेवा या ठिकाणी मोफत पाहण्यास तसेच वेबसाईटवर देखील उपलब्ध करून देण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील २००० क्रांतिकारकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे मोफत प्रदर्शन देशभक्तीमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात उत्साहात झाले. दिवसभरात सुमारे २० हजारावर भाविकांनी प्रतिसाद दिला. 
             आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी म्हणाले, कोणताही संकल्प हा जेव्हा सत्य असतो. तेव्हा तिथं सत्यनारायण उपस्थित असतात. सत्यनारायण याचा अर्थ सांगत ते म्हणाले, जेवढे काही थोर क्रांतिकारक आहेत. ते प्रत्येक्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी अवतरलेले एक प्रकारचे स्वतंत्रतेचे संतच होय. देशभक्ती आणि देवभक्ती यामध्ये धर्माचे अधिष्ठान असते. ज्या ज्या क्रांतीकारकांना शिक्षा झाली. ती काळ्या पाण्याची असो, कि जेलची. त्या त्या क्रांतिकारकांनी त्यांच्या एकांत वासाच्या तुरुंगवासात आपला अनुभव हा धर्मात उतरविला. लोकमान्य टिळक यांनी ज्या गीतेतील रचना केल्या त्याही अंदमान येथील एकांतवासात. क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचे लिखाण देखील एकांतवासात झाले आहे. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या रचना कार्य देखील तुरुंगवासात झाले आहे. 
           देव आणि धर्म यांचे मध्ये देश आहे. आणि देशाचे आपण काही देणे लागतो. १८५७ च्या स्वतंत्रता संग्राम मध्ये वंदे मातरम हे गाणे सर्व क्रांतिकारकांच्या मुखावर होते. भक्ती हि स्वतंत्र असते. भक्ती हा भागवत धर्माचा पाय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जमिनीला मातृत्वाचा अधिकार दिला. सर्वात आदी या जमिनीला ( मेदिनी ) पृथ्वीस दुष्टांपासून सोडविण्याचे कार्य, जर कोणी केले असेल तर भगवान विष्णू यांनी केले. यामुळे पहिला क्रांतिकारक जर कोण असेल तर ते आद्य क्रांतिकारक भगवान विष्णू होत. या ठिकाणी २००० क्रांतिकारकांचे छायाचित्र प्रदर्शित झाली आहेत. सर्व क्रांतीकारकांच्या त्यागाच्या देश सेवेच्या भूमिकेस त्यांनी वंदन केले. अतिशय उत्तम असे प्रदर्शन यापुढील काळात पुन्हा भरवावे. त्यास सर्वोतोपरी सहकार्य आळंदी देवस्थान करेल अशी ग्वाही विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी दिली. 
             या प्रदर्शनात २ हजार ज्ञात व अज्ञात क्रांतिकारकांची सविस्तर माहिती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ७५ फोटो वेगवेगळ्या माध्यमांतुन उपलब्ध करून प्रदर्शित करण्यात आल्याचे संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. आळंदी मंदिरात झालेल्या या प्रदर्शनास खूप मोठा प्रतिसाद मिळाल्याचे देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांनी सांगितले. आळंदी परिसरातील शालेय मुलांनी पालकांसह तसेच नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन छायाचित्र प्रदर्शनास प्रतिसाद दिला. ९४८ दिवसाच्या ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांती मंदिर या परीक्रमेची तसेच २००० छायाचित्रांचे प्रदर्शन या संकल्पनेची लोक जागरणासाठी गरज असल्याचे विधीतज्ञ् नंदिनी शहासने यांनी प्रास्ताविकात सांगत उपक्रमाची माहिती देत संवाद साधला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!