शिक्रापूर प्रतिनिधी
दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा या महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या अभियाना अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट रोजी शिक्रापूर परिसरातील सर्व माजी सैनिक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले तदनंतर आजादी का अमृत महोत्सव या फलकाला पुष्पहार अर्पण करून शिक्रापूर ग्रामपंचायत येथून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,
या रॅलीमध्ये माजी सैनिक शिक्षक वृंद विद्यार्थी मित्र पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांनी सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित केला .14 ऑगस्ट रोजी शिक्रापूर नगरीच्या उपसरपंच सारिका ताई सासवडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले त्यावेळी प्रामुख्याने उपस्थितांमध्ये उपसरपंच सर्व सदस्य ग्राम विकास अधिकारी शिवाजी शिंदे ,तलाठी सुशीला गायकवाड मॅडम,कृषी अधिकारी अशोक जाधव साहेब माजी सैनिक शिक्षक वृंद विद्यार्थी पत्रकार बांधव तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ,
दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिक्रापूर परिसरामध्ये पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद शाळा शिक्रापूर,गावठाण जिल्हा परिषद शाळा कोयाळी पुनर्वसन ,वाबळेवाडी शाळा राऊतवाडी शाळा ,चाकण रोड शाळा 24 वा मैल शाळा लव्हार्डे पुनर्वसन शाळा ग्रामीण रुग्णालय आरोग्य उपकेंद्र, महावितरण ऑफिस, विद्याधाम प्रशाला ,मोती चौक चासकमान वसाहत तसेच शिक्रापूर परिसरातील सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले स्वतंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिक्रापूर परिसरामध्ये 78 देशी झाडांचे शिक्रापूर ग्रामपंचायत व समस्या उपाय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 78 देशी झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली.या वेळेस ग्रामस्थ ,आबालवृद्ध ,आणि तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता