दिलीप भोसले यांच्या वाढदिवस निमित्त विशेष लेख

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
                  फ्रेइ्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित फ्रेंड्स नर्सरी,प्रायमरी अंड सेकैंडरी स्कूलचे सेक्रेटरी सन्मानिय दिलीपजी वामनराव भोसले यांना भरारी मीडिया न्युज या माध्यम समुदायाकडून नुकताच जिल्हा स्तरावर शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान पुरस्कार जाहीर होऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या निमिताने त्यांच्या क्षक्षणिक कारकीर्दीचा घेतलेला आढावा,
                श्री दिलीप वामनराव भोसले यांचे शिक्षण कॉमर्स B.com पर्यन्त झालेले असून देखील त्यांना शैक्षणिक क्षेत्रात भोसले सर या नावाने त्यांची जनसामान्यात ओळख निर्माण झालेली आहे.गोरगरिबांची मुलं इंग्रजी शाळेत शिकून मोठमोठ्या हुद्दयावर गेली पाहिजेत. या उद्देशाने त्यांनी त्यांच्या मित्र परिवाराला बरोबर घेऊन फ्रेड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट या संस्थेची 1996 या वर्षी स्थापना केली. व संथेच्या माध्यमातून फ्रैडस नर्सरी,प्रायमरी अँड सेकंडरी या इंग्रजी शाळेची 1996-97 यावर्षीं घोड दौड सुरू केली.आज 31 वर्ष या संस्थेला आणि शाळेला झालेली आहेत.
                  या शाळेत जवळपास 1200 मुले मुली शिक्षण घेत आहेत. या कालखंडा दरम्यान सर 1996- 1997 या साली संथेच्या संचालक पदावर विराजमान झाले.त्यानंतर 2008 ला सरांना संस्थेने सचिव पदी निवड करून काम करण्यास आणखी वाव दिला. सन 2012 ला शाळेतील पूर्ण विद्यार्थ्याची फी पालकांना बॅकेत जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. जेणे करून आर्थिक बाबतीत पारदर्शक नियोजन राहील,
               सन 2015 ला शाळेची भव्य तीन मजली इमारत अध्यक्षाना मदतीला घेउन शाळेची भव्य वास्तु उभी केली.शिक्षकांना अडीअडचणीच्या वेळेस लग्नकार्य,वैदयकीय मुलांचे शिक्षण या कामी सढळ हाताने मदत करत राहिले.गरीब विद्यार्थ्यांना मदत ,तर सन 2018 लाशाळेसाठी 20 गुंे जागा उपलबध करण्यात सरांचे मोलाचे योगदान लाभले आणि सरांच्या कारकिर्दीत नेहमीच दरवर्षी दहावीचा 100% निकालाची आबादीत परंपरा कायम सरांनी राखली
            भोसले सर म्हणजे शिक्षकांना प्रोत्साहित करणारा,विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणारा,होत करू गरीब विद्यार्थ्याना मदतीचा हात देणारा सहदयी माणूस इतकेच नव्हे तर तालुका पासून मंत्रालयापर्यत सर्वच अधिका्यासोबत मैत्रीचे स्नेहाचे संबंध निर्माण करून सरांचे अधिकाऱ्यांसोबत मैत्रीचे आणि स्नेहाचे संबंध आहेत. सर पुणे जिल्हा मॅनेजमेंट समितिवर सदस्य आहेत.शाळेच्या गुणवता वाटीचा ध्यास घेणारे प्रभावी नेतृत्वाची चुणूक दाखविणारे,त्यांतुनच सरांची सखी सावित्री समितीच्या निमित्ताने सन 2023-24 या साली सरांची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. इतकेच नव्हे तर पुणे जिल्हयातील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रायव्हेट मॅनेजमेंट असोसिएशनच्या चळवळीत सर नेहमीच सक्रिय भूमिकेत असतात. सरांना पर्यटनाची ट्रॅकिंगची आवड असून महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील अनेक राज्यातील धार्मिक स्थळे मंदिरे,देवस्थाने भेटी देऊन गडकोट सर करून सरांनी सर ही जनसामान्यातील पदवी खरी केली आहे.सरांच्या आज शुुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!