सुनील भंडारे पाटील
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भर पावसात दिड तास रस्त्यावर उतरून आमदार अशोक पवार यांनी वाहतुक कोंडीतून नागरिकांचा मार्ग केला मोकळा...!
पुणे जिल्ह्याच्या तळेगाव ढमढेरे येथे आठवडे बाजार व पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. आमदार अशोक पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुमारे दिड तास न्हावरे ते शिक्रापूर मार्ग,कासारी फाटा ते तळेगाव ढमढेरे, राहू ते तळेगाव ढमढेरे रोडवरील झालेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना रस्ता मोकळा करून दिला.