सुनील भंडारे पाटील
माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर (तालुका शिरूर) येथील राहत्या घरी ईडीने छापा टाकल्यानंतर सुमारे साडेपाच कोटी एवढी रक्कम सापडली, ही रक्कम ईडी विभागाने ताब्यात घेतली असून गेल्या चार वर्षांमधील बांदल यांच्यावरील ही ईडीची दुसरी कारवाई आहे,
बांदल यांनी पुणे जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आली होती, त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत एकदा विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आले होते, त्यांच्या सततच्या पक्ष बंडखोरीमुळे राजकीय प्रतिमा मलिन झाली असून चार वर्षांपूर्वी त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्यांना जेलवारी देखील झाली होती, यामधून गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांची सुटका झाली होती, शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित कारवाई झाली असून, कायम वादग्रस्त असणारे बांदल यांच्या शिक्रापूर येथील घरी नुकतीच ईडीने कारवाई केली असून त्यामध्ये सुमारे साडेपाच कोटी रुपये रोकड सापडली असून पुढील तपासासाठी बांधल्यांना ताब्यात घेऊन मुंबई येथे नेण्यात आले आहे,