श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. देवस्थान तर्फे मंदिर परिसरात पत्रा शेड व मांडव घालण्यात आले होते,
दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि तर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे श्रेष्ठ कार्य केले. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने ह.भ. प. गंगाधर महाराज पाटील, आळंदी यांचे सुभाष्य कीर्तन झाले.
चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला. जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून होते.