चर्तुर्थी दिनी लाखो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन घेतले

Bharari News
0
जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे
     अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष. बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे ,सचिव सुनिल घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे यांच्या शुभाहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले.मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली.                                  महाआरतीचा मान गणेशभक्त माऊली खंडागळे,नितीन बद्रिके,राहुल येळवडे,राजकुमार ठोसे,शंकर भोर यांना मिळाला .पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत सुमारे पन्नास हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.०० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली. आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री. विघ्नहर् गणपती देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र ओझर तर्फे श्री विघ्नहर मंदिरात निम्मित संकष्टी चतुर्थी विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख व श्री विघ्नहरासमोर फूलांची आकर्षक सजावट करण्यात आली. 
           तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. व येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,पिण्याचे पाणी,अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष ,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान ,चप्पल stand पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली. दिवसभर पडणाऱ्या वरूणराजाच्या हलक्याश्या पावसांच्या सरीत सुद्धा भाविकांनी रांगेतूनच दर्शन घेतले . पावसापासून संरक्षणासाठी मंदिरासमोरील आकर्षक सभामंडप तसेच पार्किंग तळावरील 100 बाय 200 चे पत्राशेडचा भाविकांनी उपयोग करून घेतला .सायंकाळी ७.०० वा. नियमित हरिपाठ करण्यात आला. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प. साईनाथ महाराज गुंजाळ जुन्नर ,यांचे हरिकीर्तन झाले.
              त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळा शिरोली यांनी दिली. आजचे अन्नदाते लंबोदर रवळे ओझर यांनी चतुर्थीचे वारकरी अन्नदान केले रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले. आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी विकास कामात सहभागी होवून ट्रस्ट ला देणगी दिली. आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त विक्रम कवडे , प्रकाश मांडे , सुर्यकांत रःवळे , गोविंद कवडे , समिर मांडे , विनायक मांडे , संतोष कवडे , विलास कवडे , विनायक जाधव, मंगेश पोखरकर यांनी केले.गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!