सुनील भंडारे पाटील
आगामी विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली असून शिरूर हवेली विधानसभा मतदार संघामध्ये आता चर्चेला उधाण आले असून भावी आमदार कोण याविषयी गावागावांमधील गाव कट्ट्यावरील तसेच चौका चौकामध्ये चर्चा रंगू लागली आहे, त्यामध्ये बऱ्याच जणांच्या तोंडून आमदार अशोक बापू पवार यांचे नाव समोर येत आहे,
गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांनी आपल्या कारकिर्दीत विकास कामांचा डोंगरच उभा केला आहे, विकास कामांच्या बाबतीत पवार यांचा कोणचा हात धरू शकत नाही, विशेषता शिरूर हवेली मध्ये गावागावांमध्ये जोडणारे रस्ते, शुद्ध पेयजल योजना, अंत्यविधी दशक्रिया ठिकाने, व्यायाम शाळा, जिल्हा परिषद शाळा, व इतर अनेक कामांच्या विकासासाठी अगदी वाड्यावस्त्यांपर्यंत भरगोस निधी टाकून विकास कामांची रेलचेल मोठी दिसत आहे,
सत्ता नसतानाही विरोधी बाजूस बसून आमदार पवार यांनी शिरूर हवेली मतदारसंघांमध्ये विकास कामांमध्ये कुठल्याच प्रकारची कसर केलेली नाही, त्यामुळे या भागातील जनता आमदार पवार यांना कार्यसम्राट या नावाने ओळखत आहेत व प्रसिद्ध देत आहेत, हा पवार यांचा मोठेपणाच म्हणायला हवा, गरीब, शांत, संयमी, कष्टाळू, प्रसंगावधान, निर्णय क्षमता या महत्त्वपूर्ण गुणांमुळे आमदार अशोक बापू पवार यांनी जनतेच्या मनामध्ये जागा केलेली आहे, अशा चर्चेला सध्या शिरूर हवेली मतदारसंघात चर्चेला उधाण आले असून भावी आमदार म्हणून अशोक बापू पवार यांची निवड होणार अशी चर्चा सद्यस्थितीत गावागावांमध्ये रंग धरू लागली आहे,