यवत प्रतिनिधी नवनाथ वेताळ
यवत (तालुका दौंड) येथील टेस्टी बाईट कंपनीत विषारी वायूगळती झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत १७ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भांडगाव ता. दौंड जिल्हा पुणे ग्रामपंचायत हद्दीत टेस्टी बाईट ही खाद्यपदार्थाची कंपनी आहे. या कंपनीत अनेक महिला व पुरुष असे दोघेही काम करतात,
कंपनीमध्ये कामगार काम करीत असताना कंपनीत अचानक फ्रोझन फुड प्रोडक्शन युनिट मध्ये फ्रिजसाठी वापरण्यात येणारे अमोनिया गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने विषारी वायूगळती झाली. यामध्ये कंपनीत काम करणाऱ्या १५ महिला व २ पुरुष अशा १७ कामगारांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर कामगारांना भांडगाव येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.
आणि त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.या घटने मध्ये अलका संभाजी डमरे, दैवशाला मोहन शिंदे (दोघीही रा. भांडगाव) व सपना सतीश शितोळे (रा. पडवी) या तिघींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर २ पुरुष आणि १२ महिला अशा १४ कामगारांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर भांडगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत,कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने काय तरी उपाय योजना करण्यात यावी आणि कामगारांच्या चांगल्यात चांगल्या सेवा कंपनीने प्रदान कराव्यात आणि अशा होणाऱ्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खरबदारी घ्यावी अशी चर्चा स्थानिक आणि कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे.