पुणे जिल्हा प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो लोक एकत्रित जमा होऊन शांतता रॅली काढून सभा घेणार असल्यामुळे, या वेळेत वाहतुकीची कोंडी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा ,कॉलेज यांना दिनांक ७ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केलेली आहे.तसेच ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजे पर्यंत मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना जाण्यास येण्यास बंद करण्यात आला आहे.
शांतता रॅली मध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होणार असल्यामुळे लोकांची होणारी गर्दी शहरातील विविध शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी, अनुदानित व विना अनुदानित शाळा आश्रम शाळा, महाविद्यालय व व्यवसाय तसेच प्रशिक्षण केंद्र यांच्या शैक्षणिक संस्था मधील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.