सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथे विद्युत शॉर्ट सर्किट मुळे दीड एकर ऊसाला ऐन दुपारच्या उन्हाच्या काऱ्हात आग लागल्याने संपूर्ण दीड एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे,
गावातील कोरेगाव भीमा रस्त्यालगत असणाऱ्या पासलकर फार्म व रामदास भंडारे यांच्या ऊसाला आज दुपारी अचानक आग लागली, भीमा नदीच्या बाजूने असणारे महावितरण कंपनीचे मुख्य विद्युत रोहित्र या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने नजीक असणाऱ्या ऊसाला आग लागली, 15 महिने कालावधीचा असणारे या उसामध्ये पाचटाचे प्रमाण जास्त असल्याने आगीने खूप मोठा भडका धरला, आज दुपारची वेळ असल्याने तसेच कडक उन्हामध्ये आगीची तीव्रता जास्त होती भीमा नदीच्या बाजूने उत्तर बाजूला ऊस पेटत आल्याने ऊस पेटलेला उशिरा लक्षात आले,
आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ऊस विजवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न असफल ठरले दक्षिण बाजूने पेट घेतल्यानंतर उत्तर बाजूच्या शेवटच्या टोकापर्यंत ऊस जळून खाक झाला, सद्यस्थितीत ऊस कारखाने बंद असल्याने आता या उसाचे करायचे काय असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून संबंधित शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे महावितरणच्या चुकीमुळे संबंधित ऊस जळाल्याने संबंधित शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी रामदास भंडारे यांनी केली आहे,