दिनांक ३०/०९/२०२४ रोजी युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना ऋषीकेश ताकवणे यांना माहिती मिळाली की, पेरणे गाव ते कोळपे वस्ती रोड (तालुका हवेली) येथे एक महिला भट्टी लावून दारू तयार करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी युनिट ६ च्या टिमने अचानकपणे छापा टाकला,
महिला नामे निलम बजरग परदेशी वय ३० रा. मोलाई चौक, पेरणे, ता हवेली, जि पुणे ही तिच्या घराच्या मागे भट्टी लावून दारू काढत असताना मिळून आली असून तिचे ताब्यात सुमारे ७० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व ५००० लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण ४,५२,५०० रू किं चा मुद्देमाल मिळून आला आहे. तीस पुढील कारवाईकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन केले आहे.
सदरची कामगिरी शैलेश बलकवडे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे , मा निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त , गुन्हे , मा राजेंद्र मुळीक सहा पोलीस आयुक्त २ यांचे मार्गदर्शनाखाली सुदर्शन गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ६ पुणे शहर, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे या पथकाने केली.