बारामती प्रतिनिधी
आज पुणे जिल्ह्यात बारामती तालुका हादरवणारी घटना घडली असून बारामती शहरातील एका महाविद्यालयात विद्दयार्थ्याचा धारदार शास्त्राने वार करत खून करण्यात आला. सद्यस्थिती पुणे जिल्ह्यामध्ये मुलांमध्ये गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले असून अशा गुन्हेगारांना कुठेतरी आळा बसला पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून वारंवार होत आहे,
बारामती मध्ये घडलेली घटना ही घटना अतिशय धक्कादायक असून विद्येचे माहेरघर असणाऱ्या विद्यालय परिसरात अशा स्वरूपाच्या घटना घडणे म्हणजे लाजिर वानी बाब आहे, बारामती मध्ये आज दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीच्या वातावरण तयार झाले असून सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे,अथर्व पोळ (वय १8) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे, सोमवारी (दि. 30)रोजी दुपारी ही घटना घडली.प्राथमिक माहितीनुसार तिघांनी अथर्व याच्यावर वार केले. एकाला बारामती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोघे फरार झाले आहेत. साधारणतः 15 दिवसापूर्वी त्यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जात असून. त्याचा परिणाम म्हणून या तिघांमध्ये एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचे परिवर्तन थेट खुनात झाल्याने ही घटना घडल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले, या घटने मुळे बारामती शहरात तसेच विद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे,