दि 26/10/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट -6 कडील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, ऋषीकेश ताकवणे व रमेश मेमाणे हे युनिट हद्दीत अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा सार्वजनिक रोडवर भैरवनाथ मंदिर, वाघोली या ठिकाणी गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी अचानकपणे छापा घातला असता इसम नामे *चांद कासम पठाण वय 44 वर्ष रा. भैरवनाथ मंदिर समोर, वाघोली, पुणे* याचे ताब्यात 300 ग्रॅम गांजा बेकायदेशीररित्या विक्रीकरिता जवळ बाळगले असताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे), राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, समीर पिलाने, बाळासाहेब तनपूरे, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.