सुनील भंडारे पाटील
आज रोजी गुन्हे शाखा युनिट 6 हद्दीमध्ये पोलीस उप-निरीक्षक दळवी, ऋषीकेश व्यवहारे, रमेश मेमाणे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर असे गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना *ऋषीकेश व्यवहारे* यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार गणेश काळे हा महादेव मंदिर शेजारी , शिवशंभो नगर, लाडबा वस्ती, केसनंद येथे थांबलेला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने,
त्यास शिताफीने सापळा रचून ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव *गणेश रामदास काळे, वय 34 वर्षे रा. वाघेश्वर नगर, गायरान वस्ती, वाघोली, पुणे* असे सांगितले. सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याचेवर लोणीकंद पोलीस ठाणे येथे जबरी चोरी ( सह मोक्का ), गंभीर दुखापत, म पो का १४२ कारवाई यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यास तडीपार आदेश क्र.52/2022 नुसार मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 (1),(अ)(ब) प्रमाणे दि. 28/10/2022 रोजी पासुन 02 वर्षासाठी पुणे शहर आयुक्तालय, पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हयाच्या हद्दीतुन तडीपार केले होते. आज रोजी तो मिळून आल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास करणेकामी वाघोली पोलीस स्टेशनचे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, बाळासाहेब तनपूरे, गणेश डोंगरे, किर्ती नरवडे, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.