सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे भीमा नदी लगतच्या पुलावळील पश्चिम बाजूला भीमा नदी काठावर असणारे विद्युत रोहित्र पंधरा दिवसांपूर्वी चोरीला गेले असून या रोहित्रारावर अवलंबून असणारे सुमारे दीडशे ते दोनशे एकर बागायत शेती पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर ताण वाढला आहे, मात्र या प्रश्नाला कोणीच वाली नसल्याचे चित्र सष्ट होत आहे,
संबंधित ठिकाणी असणारे विद्युत रोहित्र पंधरा दिवसांपूर्वी चोरट्याने रात्रीच्या वेळी खाली पाडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरून नेल्या त्यामुळे या रोहित्रारावर अवलंबून असणारी शेती पिके, रहदारी, तसेच मुकी जनावरे यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, महावितरण विभागाच्या वतीने संबंधित रोहित्र चोरी गेल्याचा पंचनामा करण्यात आला आहे, परंतु त्यानंतर कारवाई ठप्प झाले असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, यावर अवलंबून असणारे मोठे उसाचे बागायत क्षेत्र तरकारी पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून महावितरण कनिष्ठ अभियंता कोरेगाव भिमा यांनी संबंधित रोहित्र तातडीने बसवावे अशी मागणी शेतकरी वारंवार करत आहेत,
कनिष्ठ अभियंता महावितरण कोरेगाव भीमा टेमगिरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही,