आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न
तब्बल १६ कोटीपेक्षा अधिक विकास कामांचे भूमिपूजन
सुनील भंडारे पाटील
वाघोली (ता. हवेली) येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले .
यावेळी विकास कामांमध्ये वाघोली येथील केसनंद फाटा, नायरा पेट्रोल पंप, म्हसोबा मंदिर ते सुप्रिया हॉटेल, जे जे नगर केसनंद रोड, काळुबाई नगर येथील ड्रेनेज लाईन करण्यासाठी सुमारे ४कोटी १५ लाख रुपये तर फुलमळा रोड येथील पावसाळी लाईन टाकण्यासाठी ३ कोटी १७ लाख रुपये तसेच संत तुकाराम नगर ते कापूर विहीर, पूर्व रंग सोसायटी पर्यंत, भावडी रोड अल्फा लँड मार्क सोसायटी व जाधव वस्ती,जेड सोसायटी नगर रोड ते कावेरी नाल्यापर्यंत ड्रेनेज लाईन करणे यासाठी ४ कोटी १७ लाख तर भावडी रस्ता मनपा हद्दीत पर्यंत विकसित करणे १ कोटी ६७ लाख रुपये तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाघोली येथील ३० मीटर आर पी बायपास रस्ता विकसित करणे या कामासाठी ३कोटी ३३ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व विकास कामांसाठी आमदार अशोक पवार यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार करत संबंधित अधिकाऱ्यांचे भेट घेत पाठपुरावा केला होता.
यावेळी संजय आप्पा सातव पाटील शिवदास उबाळे बाळासाहेब सातव राजेंद्र पायगुडे युवराज दळवी यांच्यासह चेअरमन, व्हाइस चेअरमन, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,