लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पूणे यांचे वतीने पुणे जिल्हयातील तालुक्याचे ठिकाणी बाजारपेठ, गर्दीचे ठिकाणी पोलीस स्टेशनचे ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने व त्यांचे स्टाफ यांनी शिक्रापूर व लोणीकंद या ठिकाणी जाऊन कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास ,
अथवा कोणी खाजगी इसम शासकीय कामासाठी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग टोल फ्री नं 1064 यावर किंवा फोन न. 02026132802,26122134 व्हाट्सअप नंबर 7875833333 या नंबर वर संपर्क करण्याबाबत समक्ष कळविण्यात आले,
ठिकठिकाणी भिंतीपत्रके चिकटविण्यात आले आहे. तसेच नमूद अभियानाचे अनुषंगाने कोणी शासकीय अधिकारी व कर्मचारी लाच मागणी करीत असल्यास न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे व पोलीस उप अधीक्षक दयानंद गावडे यांनी केले आहे.