गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे,३४ रेडके पकडले

Bharari News
0
गोरक्षण सेवा समिती निपाणी ची मोठी कारवाई 
कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे, ३४ रेडके पकडली
कागल पोलिसांची कारवाई; एकजण ताब्यात कागल :.
निपाणी प्रतिनिधी
                  कत्तलीसाठी चार दिवस व एक आठवडे वयाची १८ गायींची वासरे व त्याच वयाची म्हशींची ३४ रेडके बेकायदेशीररीत्या टेम्पो व गोठ्यात ठेवली आहेत अशी माहिती गोरक्षण सेवा समिती निपाणी चे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मिळाली यावेळी सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने या वासरांना ची सुटका केली ,
              यावेळी वासरांची तोंडे चिकटपट्टीने बांधण्यात ठेवलेल्या अवस्थेत मिळाली. ही सर्व जनावरे गोरक्षण सेवा समिती निपाणी चा कार्यकर्ते यांनी कागल पोलिसांच कडे स्वाधीन केली. यावेळी यांची किंमत दोन लाख २८ हजार आहे.
               याप्रकरणी मोहम्मद हसन शेख (वय ३९, रा. करनूर, ता. कागल) याला ताब्यात घेण्यात आले. याबाबतची फिर्याद गो-रक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली मोहम्मद शेख याने करनूर येथील जनावरांच्या गोठ्यात तसेच चार चाकी वाहनात (एम.एच. ०९. सी.यू ५६ ७६) १८ वासरे व ३४ रेडके मिळून आली.
              वासरांना तसेच रेडकांना चार चाकी वाहनाचा परमिट नसताना, मुक्या जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता, काही वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी गाडीत व आपल्या गोठ्यात दाटीवाटीने बेकायदेशीररीत्या ठेवल्याचे आढळून आले.
            ही कारवाई श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गर्शनाखाली झाली यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांनी सदरील वासरांना पुढील संगोपनासाठी भगवान महावीर गोपालन सामाजिक सेवा संस्था कराड संचलित ध्यान फाउंडेशन गोशाळा घोलपवाडी येथे या वसरांनाची प्राणलिंग स्वामीजी यांनी वेवस्था केली गोरक्षण करते वेळी 
सकल हिंदू समाज कोगनोळी, कागल येथील कार्यकर्ते यांनी केली यावेळी करनुर गावामध्ये तणावाचे वातावरन झाले होते यावेळी समाधी मठाचे स्वामीजी यांनी सर्वांना आव्हान केले आहे की जनावरे सांभाळासाठी काही अडचण असेल तर ती समाधी मठ गोशाळा मध्ये आणून द्यावीत,
                गोरक्षण सेवा समिती निपाणी प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सांगितले की गोमतेची बेकादेशीररीत्या वाहतूक किंवा कत्तल होत असेल तर जवळच्या पोलीस प्रशासनशी किंवा गोरक्षण सेवा समिती निपाणी यांच्याशी संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!