समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात जुन्नर महावितरण उपअभियंता राजेश दाभाडे त्यांच्यासह पत्नी आणि मुलगा यांचा मृत्यू
ऐन दिवाळीत दाभाडे कुटुंबावर शोककळा
दोन महिन्यांपूर्वी अमरावती या ठिकाणावरून शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणी महावितरण उप अभियंता म्हणून राजेश दाभाडे यांची नियुक्ती झाली होती पुणे या ठिकाणी आपल्या कुटुंबासह राहत असताना दीपावली या सणासाठी ते आपल्या गावाकडे जात असताना समृद्धी महामार्गावर त्यांचा अपघात झाला.
त्यांनी जुन्नर या ठिकाणी पदभार स्वीकारताच अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले व ते पाळले देखील असा कर्तव्यदक्ष अभियंता होणे नाही असे मत जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले असून त्यांच्या जाण्याने महावितरण शिरोली बुद्रुकचे महावितरण चे मोरे आणि त्यांचा सर्व स्टाफ याविषयी शोक व्यक्त करीत आहे.
दिवाळीसाठी राजेश दाभाडे आणि त्यांची पत्नी शुभांगी आणि मुलगा हे अमरावती या ठिकाणी आपल्या गावी जात असताना रात्री दहा वाजता जुन्नर येथील सर्व स्टाफला शुभेच्छा दिल्या आणि रात्री दोन वाजता त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.