अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनिल घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त विलास कवडे ,संतोष कवडे,सौ.शिल्पा जगदाळे यांच्या शुभाहस्ते श्रींना महाअभिषेक पुजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले.
दिपावली निमित्त श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर मंदिरात विविध धार्मिक विधी संपन्न ,प्रामुख्याने वसू बारस या दिवशी श्री विघ्नहर उद्यानामध्ये असलेल्या गाईचे पूजन करण्यात आले,लक्ष्मीपूजन दिनी श्री विघ्नहराचे अलंकार तसेच देवस्थान ट्रस्ट चोपडी पूजन करण्यात आले. पाडव्या निमित्त श्री विघ्नहर मंदिरात विशेष अशी महाआरती गणेशभक्त राहुल कवडे,नवनाथ कवडे,शिवाजी रवळे ,किसन जाधव ,लक्ष्मण विधाटे या मान्यवरांच्या शुभाहस्ते करण्यात आली.
आज दिपावलीचा मुख्य दिवस भाऊबीज या निमित्त श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट आयोजित दिपावली पहाट स्वरसम्राट राहुल दुधवडे प्रस्तुत सूरसंगम भावगीते व भक्तगीते गायनाचा संगीतमय कार्यक्रम पहाटे ५. ते ७ .३० या वेळेत संपन्न झाला .या कार्यक्रमासाठी श्री राहुल दुधवडे सर,भैरवी डेरे
यांनी गायक म्हणून काम केले ,तसेच कोरस विकास कवडे, खुशी कवडे, काव्या कवडे, तनिष्का कवडे
,तबला वादक श्री संजीव जाधव ,किबोर्ड वादक हृषिकेश खुडे ,ऑक्टो पॅड विनोद पायाळ यांनी काम पहिले,
सदर कार्यक्रमाची सागंता मंगलमय वातारणात ठीक ७.३० वा.श्रींच्या दैनंदिन आरतीने संपन्न झाली.गायक वादक यांचा सत्कार श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे ,उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनील घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त संतोष कवडे,शिल्पाताई जगदाळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.