आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्यात असलेल्या शिनोली या गावांमध्ये गेली ६७ वर्ष जपत आलेली परंपरा श्री दत्त जयंती उत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक ८/१२/ २०२४ ते १५/१२/२०२४ या कालावधीमध्ये करण्यात आले आहे,
अखंड हरिनाम सप्ताह बरोबरच रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यामध्ये सकाळची काकड आरती, प्रवचन, हरिजागर, अन्नप्रसाद आणि कीर्तन हया कार्यक्रमाचे आयोजन श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ शिनोलीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी नऊ ते आकरा ह. भ. प. वैभव महाराज राक्षे यांचे काल्याचे किर्तन होईल त्यानंतर ११ ते १२ नगर प्रदक्षिणा होईल आणि १२ नंतर अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डी बी साहेब बोऱ्हाडे, हरिश्चंद्र हिंगणे,मधुकर बोऱ्हाडे, डॉक्टर आत्माराम बोऱ्हाडे,बाळ श्रीराम बोऱ्हाडे, शिवाजी बोऱ्हाडे,
अशोक बोऱ्हाडे,सचिव लक्ष्मण ढेरंगे, खजिनदार दामोदर बोऱ्हाडे,,दिलीप बोऱ्हाडे,अरुण बोऱ्हाडे, भालचंद्र बोऱ्हाडे,सुनील गावडे दत्तात्रय आनंदराव, भगवान बोऱ्हाडे,शिवराम बोऱ्हाडे सह शिनोली ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.