सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम आयुष्यमान भारत व ई श्रम कार्ड चे मोफत वाटप

Bharari News
0
इंदापूर प्रतिनिधी
              राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मा जयदेवराव आहिलू इसवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एक दिवसीय शिबिरास प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ४५० नागरिकांनी याचा लाभ घेतला असल्याचे जयदेव इसवे यांनी सांगितले तसेच उपस्थित नागरिकांना आयुष्यमान भारत व ई श्रम कार्ड चे फायदे काय आहेत याची माहिती दिली ,

             प्रत्येक नागरिकांनी या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात त्यातील हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे आवर्जून उल्लेख केला बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना घरेलू कामगारांना मिळणाऱ्या सुविधा विश्वकर्मा योजनेतून मिळणारे लाभ अनेक महिला पुरुष बांधवांनी घेतला असून या पुढेही शासनाच्या विविध प्रकारच्या योजना सामाजिक न्याय विभाग पुणे शहराच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत,

 नागरिकांनी याचा लाभ घ्यावा कार्यक्रम प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पोटे शहर उपाध्यक्ष निरीक्षक डॉ गौतम पिसे उपाध्यक्ष विक्रम मोरे हडपसर विधानसभा अध्यक्ष वामन धाडवे कार्याध्यक्ष नामदेव उपाडे कोथरूड विधानसभा अध्यक्ष अमित तुरूकमारे छ. शिवाजी नगर विधानसभा अध्यक्ष युवराज जेठीथोर पर्वती विधानसभा अध्यक्ष कुमार खंडागळे उपाध्यक्ष प्रशांत खुंठे सचिव अविनाश येणपुरे सेवादलाचे जाधव साहेब सरचिटणीस गौरीताई आबनावे चिटणीस आनंद कदम राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे प्रदेश सचिव सत्यजित जाधव पर्वती अध्यक्ष मनिषाताई गायकवाड मयूर गायकवाड ऋषिकेश पोटावळे राकेश सूर्यवंशी लक्ष्मण काळे सुभाष तिखे विष्णू चव्हाण माधव रावणे अविनाश जाधव प्रवीण थनवाल स्मिता इसवे सुलोचना जाधव वंदना वाघमारे संगीता निवेकर संगीता चौरे आदी पदाधिकारी व असंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन स्वरूप जयदेव इसवे, स्वरित जयदेव इसवे यांनी केले होते
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!