पुणे: एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, पुणेच्या संचालक प्रो. डॉ मंगेश कराड यांच्या हस्ते व व्यवस्थापनाने डॉ. सुषमा तायडे (क्रीडा संचलिका, श्रीरामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे.) यांच्या युवकांच्या क्रीडा विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांची दखल घेत युवक दिनानिमित्त त्यांचा विशेष सन्मान केला. व हा योगायोग असे की आज त्यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ता मिळालेले युवा पुरस्कार ही त्यांच्यासाठी अनोखी भेट आहे
डॉ. सुषमा तायडे यांनी युवकांमध्ये क्रीडा स्पर्धा आणि विविध क्रीडाप्रकारांमध्ये सहभाग वाढावा यासाठी मोलाचे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या गौरवसोहळ्यात उपस्थितांनी त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा करत असताना सांगितले की भारताचे राष्ट्रपती के आरं नारायण यांच्या हस्ते यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे तसेच त्यांनी पुणे विद्यापीठाच्या महिला हॉकी संघाचे व्यवस्थापक आणि महाराष्ट्र सॉफ्टबॉल क्रिकेट महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे त्यांना हॉकी आणि बॉल बॅडमिंटन मध्ये सहा राष्ट्रीय प्रमाणपत्र आणि हॉकीमध्ये पाच अंतर विद्यापीठ प्रमाणपत्र मिळाले आहे. युवकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. डॉ. तायडे यांच्या या अथक प्रयत्नांमुळे युवकांमध्ये क्रीडाविषयी जागरूकता आणि जोश निर्माण झाला आहे.
युवक दिनाच्या निमित्ताने झालेल्या या सन्मानाने क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमास संस्थेचे सुरज बोयर,पद्माकर फड, महेश चोपडे, आशा शिंदे, शोभा शिंदे गरड सर असे अनेक मान्यवर उपस्थित होते .तसेच त्यांना यूवा युवा पुरस्काराबद्दल श्री रामचंद्र एज्युकेशन संस्थेचे संस्थापक सचिव श्री शंकर रामचंद्र भूमकर व संस्थेचे खजिनदार उद्धव रामचंद्र भूमकर यांनी त्यांचे अभिनंदन केले व युवक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्य डॉ. अविनाश देसाई सर व सिद्धांत शंकर भूमकर यांनी विशेष अभिनंदन केले