श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पुस्तक प्रदर्शन व सामूहिक वाचन

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
                   श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत पुस्तक प्रदर्शन व सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले यावेळी रामचंद्र शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव शंकर भूमकर, संस्थेचे खजिनदार उद्धव भूमकर, तर प्राचार्य डॉ .अविनाश देसाई, व सिद्धांत भूमकर उपस्थित होते.
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस. आर . रंगनाथन , सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज ,यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले . यावेळी ग्रंथालयामध्ये ग्रंथ प्रदर्शन , आणि पुस्तकांचे सामुहिक वाचन घेण्यात आले . तसेच सर्वानी पुस्तक वाचनाची प्रतिज्ञा घेतली.यावेळे संस्थेचे संस्थापक सचिव शंकर भूमकर यांनी विध्यार्थाना वाचनाचे महत्व पटवून दिले . संस्थेचे खजिनदार उद्धव भूमकर यांनी ग्रंथालयाचे महत्व सांगितले , तसेच प्राचार्य डॉ. अविनाश देसाई यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर विध्यार्थाना मार्गदर्शन केले 

तसेच सध्या मोबाइल च्या अति वापरामुळे तरुण पिढी वाचन संस्कृती पासून दुरावत असल्याचे पाहवत मिळत आहे . त्यामुळे तरुण पिढी ला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने " वाचन संकल्प महाराष्ट्र " हा उपक्रम हाती घेतला.

 कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सिद्धांत शंकर भूमकर, प्रा विकास गायकवाड, डॉ सागर शिंदे , डॉ सुषमा तायडे , डॉ वैशाली तुराई ,प्रा दीपाली होडाडे , प्रा. पुरोहित, अनिल जमदाडे उपस्तिथ होते कार्यक्रमाचे आयोजन सोहम पांचाळ व अर्चना गोरवे यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!