आपटीत गाईच्या वासरावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला-वन खाते सुस्त

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
                 शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्या मधील शेवटच्या टोकाला असणारे तसेच भीमा नदीच्या तीरावर वसलेले आपटी या गावांमध्ये आज मध्यरात्री दोनच्या सुमारास सचिन सुरेश ढगे यांच्या गोठ्यामधील गाईच्या वासरावर बिबट्याने प्राण घातक हल्ला केल्याची घटना घडली आहे, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे,
                 या भागामध्ये शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून बिबट्याचा सततचा वावर तसेच मुक्या जनावर वरील बिबट्याचे सततचे हल्ले यामुळे नागरिकांमध्ये, ग्रामस्थांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे, आपटीमधील एकविरा आई देवस्थाना जवळील राहणाऱ्या सचिन सुरेश ढगे यांच्या गोठ्यामधील गाईच्या वासरावर आज मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने प्राण घातक हल्ला केल्या वेळी जनावरांचा हंबरण्याचा आवाज आल्यानंतर सचिन व त्यांच्या घरच्यांनी पाहिले असता बिबट्या वासरावर तुटून पडला होता, 

                    याप्रसंगी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी आरडाओरडा करत गोठ्याच्या पत्रावर दगड मारले त्यानंतर बिबट्या पळून गेला या घटनेत गाईचे वासरू गंभीर जखमी झाले आहे, संबंधित ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत,

याबाबतीत शेतकरी सचिन ढगे यांनी शिरूर वन विभागाशी संपर्क साधला असता तुम्ही प्रथमता रीतसर तशी लेखी तक्रार द्या तसेच गाईचे वासरू मेल्यानंतर आम्ही पंचनामा करून कारवाई करू असे उत्तर देण्यात आले, यावरून वनविभागाची तत्परता लक्षात येते,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!