सिद्धबेट केळगाव परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात संत लीलाभूमीत वृक्ष संवर्धनास प्राधान्य

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर 
                अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक चऱ्होली बुद्रुक राष्ट्रीय सेवा योजना तर्फे सिद्धबेट केळगाव परिसरात स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. यावेळी सिद्धबेट संत लीलाभूमीत वृक्ष संवर्धन, पर्यावरण संवर्धनात वृक्ष संगोपनात वृक्षांना पाणी देण्यासह स्वच्छता करीत घंटागाडीत संकलित करण्यात आलेला प्लास्टिकसह कचरा केळगाव ग्रामपंचायती कडे पुढील व्हिलर लावण्यास सुपूर्द करण्यात आला.
 या स्वच्छता मोहिमेत पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष विभागातील विद्यार्थ्यांनी इंद्रायणी घाट परिसर स्वच्छता, सिद्धबेट परिसर वृक्ष संवर्धन आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी अजिंक्य डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यां तर्फे आळंदी शहरातून प्रभात फेरी काढत वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

 या प्रसंगी आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, शशिकांत राजेजाधव, पसायदान गुरुकुलचे अध्यक्ष योगेश महाराज वाघ, रोहिदास कदम, तुषार नेटके, कैवल्य टोपे,नीलेश गायकवाड, केळगाव ग्रामपंचायत कर्मचारी वृंद यांनी प्रत्येक्ष सहभागी होत उपक्रमास मार्गदर्शन केले. आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अजिंक्य डी वाय पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे समन्वयक डॉ नागेश शेळके यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. अजिंक्य डी वाय पाटील महाविद्यालयाच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजीत कौर, प्राचार्य डॉ फारुक सय्यद, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिलीप घुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा भूषण बिरारी, प्रा रोहिणी हुलसुरे, प्रा स्वाती गांडगे, दीपक जेजुरकर व पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले. 
सिध्दबेटातील स्वच्छता अभियान झाल्या नंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्रींचे संजीवन समाधी दर्शन, मंदिर प्रदक्षिणा करत उपक्रमाची सांगता करण्यात आली.

   आळंदी देवस्थान चे वतीने उपव्यवस्थापक तुकाराम माने यांचे हस्ते सामाजिक बांधिलकीतून उपक्रम राबविल्या बद्दल आळंदी देवस्थान तर्फे महाविद्यालयाचा सत्कार करण्यात आला. पॉलिटेक्निक विभागातर्फे नाविन्यपूर्वक व समाजपयोगी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजीत कौर यांनी विद्यार्थ्यांचे व संयोजकांसह शिक्षकांचे विशेष कौतुक केले. 

आळंदी देवस्थान चे वतीने उपव्यवस्थापक तुकाराम माने यांचे हस्ते उपस्थित टीमचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॉलेज तर्फे आळंदी देवस्थानचा देखील सत्कार करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!