सुनील भंडारे पाटील
8 मार्च हा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील माहेर संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला, सर्व मातांना, भगिनींना, मैत्रिणींना आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला या विशेष दिना निमित्त विशेष कार्यक्रम होतं आहॆ. स्त्री म्हणजे त्याग, प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणा! ती एक आई आहे, जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते.
ती एक बहिण आहे, जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते. ती एक पत्नी आहे, जिला आपल्या जोडीदाराच्या सुख-दुःखाची चिंता असते. आणि ती एक मुलगी आहे, जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते.आजचा दिवस जितका महिलांसाठी खास आहे,
तितकाच तो संपूर्ण मानव समाजासाठीही खास आहे. कारण स्त्री एक मार्गदर्शक आहे. समर्थक आहे. प्रेरणादायी व्यक्ती आहे. ती आपल्या आयुष्यात कधी आई म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी मैत्रीण म्हणून, तर कधी जीवनसाथी म्हणून असते. तिच्या प्रत्येक भूमिकेचा आपण आदर करायला हवा. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे आभार मानले पाहिजेत, कारण त्या नसत्या तर आपले जीवन अपूर्ण राहिले असते.
वढू येथे मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या कार्यक्रमात पंचक्रोशी मधील बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला.व यावेळी उत्क्रुष्ट बचत गटाना सन्मानित करण्यात आले.सदर सि.लुसी कुरियन अशोक आंब्रे,आरती देसाई, मिलिंद पी.ढोके,वल्लरी गुप्ते, अंजलीताई ढेरेंगे, मनीषाताई गडदे,राणीताई करडीले,संजय भंडारे,अश्विनी जाधव,सचिव निकोला पवार,अध्यक्षा हिरा बेगम मुल्ला उपस्थित होतें.कार्यक्रमा यावेळी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माहेर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साची यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश दुतोंडे यांनी मानले.